कोसळण्याच्या स्थितीत आहे जीएसटी व्यवस्था – सुब्रमण्यम स्वामी


नवी दिल्ली – मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून वस्तु आणि सेवा करावर (GST) कडाडून टीका होत असताना आता पुन्हा एकदा भाजपचे वरिष्ठ नेता आणि राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे. जीएसटी व्यवस्था उद्धवस्त होणार आहे असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून दिला आहे. जीएसटी व्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत असून व्यापारी रिफंड न झाल्याने रस्त्यावर उतरु शकतात. आयसीआयसीआय आणि एचडीएफसीचा जमा झालेल्या डिपॉझिटमुळे फायदा झाला असल्याचे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

जीएसटीवरुन सरकारवर सुब्रमण्यम स्वामी यांची टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सुब्रमण्यम स्वामी जीएसटी लागू झाल्यापासूनच सरकारवर टीका करत आहेत. जीएसटी अत्यंत जटील असून सरकार योग्य पद्धतीने लागू करण्यात अपयशी ठरलं असल्याची टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी जानेवारी महिन्यात केली होती. जीएसटी नेटवर्कच्या (जीएसटीएन) अपयशामुळे जीएसटी पुर्णपणे अपयशी ठरल्याचेही ते बोलले होते.

Leave a Comment