शीर्षासन अवस्थेतील हनुमान मूर्ती


भारतात सर्वाधिक देवळे हनुमानाची असल्याचे आकडेवारी सांगते. या मंदिरातून हनुमानाच्या बैठ्या, उभ्या मूर्ती दिसतात. अलाहाबाद इथे झोपलेल्या हनुमनाची मूर्ती आहे. मात्र जगातील एकमेव अशी शीर्षासन अवस्थेतील मूर्ती पहायची असेल तर इंदोर उज्जैन रस्त्यावरील सावेर गावाला भेट द्यावी लागेल. या मंदिराला पातळविजय मंदिर म्हणतात.

या मंदिराची अशी कथा सांगितली जाते जेव्हा राम रावण युद्ध सुरु होते तेव्हा रावणाच्या मदतीला आलेल्या अहिरावणाने मायावी शक्तीने राम लक्ष्मण यांना अंधारात पाताळात नेले. तेथे तो त्यांचा बळी देणार होता. मात्र राम लक्ष्मण गायब झाल्याचे व त्यांना पाताळात नेल्याचे समजल्यावर त्यांच्या सुटकेसाठी हनुमान पाताळात निघाले. त्यावेळी त्याचे पाय आकाशाकडे तर डोके जमिनीकडे होते. पाताळात गेल्यावर हनुमानाने अहिरावण याचा वध करून रामलक्ष्मण यांना सोडवून आणले. म्हणजेच त्यांनी पाताळ विजय मिळविला. या विजयाचे प्रतिक म्हणून हि मूर्ती उलट्या अवतारात आहे.

या मंदिरात राम लक्ष्मण सीता यांच्या मुर्तीही आहेत. असे सांगतात कि या मंदिरात जे भाविक सलग तीन किंवा ५ मंगळवार दर्शनाला येतात यांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. हे मंदिर १२०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. या आवारात अनेक साधू संतांच्या समाध्या आहेत.

Leave a Comment