आला ब्लास्टप्रुफ,पारदर्शक गॅस सिलिंडर


गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या व त्यामुळे मोठे नुकसान झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. असे स्फोट होऊ नयेत यासाठी केलेल्या एका संशोधनात ब्लास्टप्रुफ सिलिंडर तयार केले गेले असून या सिलिंडरची डिलिव्हरी एका खासगी गॅस कंपनीकडून केली जात आहे. लवकरच या सिलिंडरचा वापर एचपीसीएल हि सरकारी कंपनी सुरु करणार आहे. सध्या हा सिलिंडर गो गॅस नावाने वितरीत केला जात आहे.

या सिलिंडरसाठी फायबर ग्लासचा वापर केला गेला आहे. यामुळे तो वजनाला हलका आहेच पण पारदर्शक असल्याने आत किती गॅस शिल्लक आहे हे तपासून पाहता येते. यात गॅस लिक होण्यासारखी अथवा स्फोट होण्यासारखी परिस्थिती काही कारणाने निर्माण झालीच तर सिलिंडरचे मटेरीअल गॅस संपविते यामुळे स्फोट होण्याची भीती राहत नाही. २, ५, १० आणि २० किलो वजनात हे सिलिंडर मिळणार आहेत. सरकारी कंपन्यांकडून हे सिलिंडर वापरात आणले गेले तर त्यावर सध्या मिळत असेलेली सबसिडी मिळणार नाही तर तो बाजारभावाने घ्यावा लागणार आहे. राजस्तान, मध्यप्रदेश , छत्तिसगढ राज्यात सध्या ही खासगी कंपनी ग्राहकांना जोड देत आहे.

Leave a Comment