फेसबुकबद्दल बरेच काही


फेसबुक या अगदी थोड्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या सोशल साईट बद्दल डेटा लिक केल्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने त्याबद्दल जाहीर माफीनामा दिला आहे. मात्र जगभरातील लोकांशी संपर्कात राहण्यासाठी हि साईट आजही लोकप्रिय आहे. या साईटविषयी काही मनोरंजक माहिती खास आमच्या वाचकांसाठी.

फेसबुक ही सर्वत्र हिट ठरलेली मार्क झुकेरबर्ग याने सुरु केलेली पहिली साईट नाही. त्यापूर्वी त्याने २००३ साली फेसमॅश नावाची एक अशीच साईट सुरु केली होती ती पूर्ण फ्लॉप होती. फेसबुकचा लोगो निळ्या रंगात आहे कारण मार्क रंगांधळा आहे वो तप फक्त निळा रंग व्यवस्थित पाहू शकतो.

फेसबुक लाँच झाल्यावर तिचे पहिल्या चार दिवसात ६५० युजर्स होते आणि केवळ ९ महिन्यात ही संख्या १० लाखांवर गेली होती. या साईटचे पहिले नाव दफेसबुक डॉट कॉम असे होते ते नन्तर फेसबुक असे केले गेले. फेसबुक हॅकर्सना दूर ठेवत नाही उलट त्यांच्या साईटमधील बग शोधून देणाऱ्या हॅकर्सना मोठी बक्षिसे दिली जातात.

फेसबुक नोकरी करण्यासाठी अतिशय उत्तम कंपनी आहे कारण येथे काम करणाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. फेसबुकवर युजर कुणालाही ब्लॉक करू शकतो पण मार्क झुकेरबर्गला कुणीही ब्लॉक करू शकत नाही. दररोज या साईटवर लाईक करणाऱ्या युजर्सची संख्या आहे ५ अब्ज आणि दर मिनिटाला या साईटवर अडीच लाख फोटो अपलोड केले जातात. फेसबुकचा तिमाही नफा आहे ५.८४ अब्ज डॉलर्स.

Leave a Comment