अवघ्या ७५ रुपयांत टाटा स्काय देत आहे ‘ही’ सुविधा


मुंबई : ७५ रुपयांचा महिन्याभराचा नवा प्लॅन डीटीएच आणि ओटीटीमध्ये भारताची अग्रेसर कंपनी टाटा स्कायने सादर केला आहे. यात ग्राहकांना चांगली सेवा प्रदान केली जाईल. युजर्संना यासाठी अतिरिक्त इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही. सर्व ग्राहकांसाठी टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहे. फक्त मोठ्या स्क्रीनवर नाही तर मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गॅजेट्सवरही हा कंटेंट उपलब्ध आहे.

याबाबत माहिती देताना स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरुण उन्नी यांनी सांगितले की, टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनच्या लॉन्चिंगसोबत सिनेमा, टेलिव्हीजन, हॉलिवूड नाही तर जगभरातील स्टोरीज जाहिरातमुक्त पाहायला मिळतील. यात ६५० तासांचा कंटेंट असेल. डीटीएच प्लेटफॉर्म पहिल्यांदाच जाहिरात मुक्त सेवा प्रदान करत आहे. ही सेवा अहोरात्र सुरु राहील आणि अधिकतर शो असे असतील की भारतातील टी.व्ही. वर उपलब्ध नसतील. लवकरच मोबाईल प्रमाणे डीटीएच आणि केबल सेवा पोर्ट करण्यात येईल. यात तुम्हाला कोणतीही सेवा निवडण्याचे स्वातंत्र मिळेल.

Leave a Comment