सॅमसंगने लॉन्च केला १३ मेगापिक्सलवाला स्वस्त फोन


नवी दिल्ली : गॅलक्सी जे ७ प्राईम २ हा फोन नुकताच सॅमसंग इंडियाने लॉन्च केला आहे. १३,९९० रुपये याची किंमत आहे. मेक फॉर इंडिया फिचरसोबत हा स्मार्टफोन येतो. ज्याचे नाव सॅमसंग मॉल आहे. युजर्स यामध्ये कोणत्याही गोष्टीचा फोटो काढून तो ऑनलाईन सर्च करुन ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करु शकतो. ५.५ इंचाचा फुल एचडी स्क्रीन यात देण्यात आली असून त्याचे डिझाईनही एवढे छान आहे की हातात पकडण्यासाठी सोपे होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

सॅमसंगच्या नव्या फोनमध्ये १.६ गीगाहर्टजचे एक्सीनोस ऑक्टा-कोर प्रोसेसर, ३जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी आहे. ही इंटरनल मेमरी कार्डच्या माध्यमातून २५६ जीबी पर्यंत वाढवता येईल. फुल मेटल युनीवॉडी डिझाईन असलेल्या या फोनमध्ये २.५ डी ग्लास लावण्यात आले आहे. याचे फिंगरप्रिंट सेंसर पुढच्या बाजूला आहे. फोनच्या दोन्ही सेंसरचे अपरचर F १.९ आहे. या डिव्हाईसमध्ये सॅमसंग पे मिनी फिचर देण्यात आले आहे. मीडिल रेंज युजर्सचा विचार करुन याची निर्मिती करण्यात आली आहे.

Leave a Comment