खगोल शास्त्रज्ञानांनी शोधला सौरमंडळाच्या बाहेर पृथ्वीच्या आकाराचा नवा ग्रह


लंडन – सौरमंडळाच्या बाहेर पृथ्वीसारख्या आकाराच्या गृहाचा शोध खगोल शास्त्रज्ञानांच्या एका आंतराष्ट्रीय पथकाने लावला आहे. तप्त आणि धातूसारखा हा ग्रह असून बुध ग्रहाच्या घनतेसारखीच या ग्रहाची घनता आहे. के-२-२२९ बी असे नाव या ग्रहाला दिले आहे. या ग्रहावर दिवसाचे तापमान २००० डिग्री सेल्सिअस आहे. पृथ्वीपासून ३४ प्रकाशवर्ष दूर हा ग्रह आहे.

वर्विक विश्वविद्यालयाचे डेविड आर्मस्ट्रॉग याबद्दल बोलताना म्हणाले की, बुध ग्रह इतर सौरयंत्रणेवरही दिसून येत आहे. जेथे मोठ्या प्रमाणात लोह आहे. बुध ग्रहाच्या घनतेप्रमाणे सौरमंडळाच्या बाहेर असलेला हा नविन ग्रह बघून आम्ही सर्वजण आश्चर्यचकीत झालो आहोत.

Leave a Comment