या महिलेने अमेरिकेत ‘देसी चहा’ विकून केली २२७ कोटी रुपयांची कमाई


मुंबई- आपल्या देशात रस्त्याच्या बाजूला, कॉलेजच्या समोर, ऑफिसच्या बाहेर जवळपास सगळ्यात ठिकाणी चहाचे स्टॉल्स पाहायला मिळतात. काहींनी चहा विकून लाखो रुपयांची कमाई केल्याची उदाहरणही आपण ऐकली आहेत. पण एक परदेशी महिलेला चहा विकून करोडपती झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण हे खरे आहे, होय हा प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेची रहिवाशी असलेली महिला ब्रुर इडी हिने तिथे चहा विकून तब्बल २२७ कोटींची संपत्ती कमाई केली आहे.

ब्रुक इडीला चहा बनविण्याची आयडिया भारतातून मिळाली. ती २००२ साली भारतात आली होती. तिने त्यावेळी उत्तर भारतातील अनेक गावांना भेटी दिल्या. तिने तेथील आले घातलेल्या चहाची चव चाखली. ती तेव्हापासून चहाच्या प्रेमात पडली. खेड्यातील प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या चहाची चव वेगळी असते हे तिच्या लक्षात आले. कोलोरॅडोमध्ये जाऊन भारतातील चहाच्या प्रेमात पडलेल्या ब्रुकने चहाचा स्टार्टअप सुरू केला. तिने २००७मध्ये ‘भक्ती चाय’ या नावाने ब्रुकने स्टार्टअप सुरू केला.

अमेरिकेत चहाची अशी वेगळी चव कधीही न चाखलेल्या अनेकांना हा देशी चहा खूपच आवडला. या स्टार्टअपमधून ब्रुकने तब्बल २२७ कोटी रूपये कमावले. ब्रुक इडीने ही माहिती एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चहा ती विकते. भक्ती चायमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या चवीच्या चहा चाखण्यासाठी नेहमीच गर्दी असते. भारताबद्दल ब्रुकला अतिशय प्रेम आहे. भारतात प्रत्येत गोष्टीत विविधता पाहायला मिळाली, असे तिने मुलाखती दरम्यान म्हटले आहे.

Leave a Comment