ओला – उबेर एकत्र येणार


अॅप बेस्ड सेवा देणाऱ्या ओला आणि उबेर यांच्या एकत्र येण्याच्या योजनेला पुन्हा गती मिळाली असून या दोन्ही कंपन्यात मोठी गुंतवणूक असलेली जपानी कंपनी सॉफ्ट बँक यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार या विलीनीकरण प्रक्रियेत ओला आणि उबेर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत.

ओलाचे प्रवक्ते या संदर्भात म्हणाले कि व्यवसाय विस्तारासाठी आम्ही नेहमीच संधीच्या शोधात असतो. उबेरने दक्षिण पूर्व आशियातील व्यवसाय ग्रॅब कंपनीस विकण्याचा निर्णय घेतला असून ग्रॅब या भागातील फूड डिलिव्हरी उबेरइट सह सर्व ऑपरेशन्स खरेदी करणार आहे. ग्रॅब मध्येही सॉफ्ट बँकेची गुंतवणूक आहे. याचसोबत चीनच्या दीदी चुक्सिंग या कंपनीतही यांची गुंतवणूक आहे. ओला आणि दीदी मिळून दररोज साडेचार कोटी राईड्स करतात अशी माहिती मिळाली आहे.

Leave a Comment