आयुर्वेदिक अंडी होताहेत लोकप्रिय


अंडी खाण्याचे फायदे तोटे याची बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. दक्षिणेत अंड्याचा नवा प्रकार आयुर्वेदिक अंडी चांगलीच लोकप्रिय झाली असून आता उत्तरेकडेही या अंड्यांचे उत्पादन सुरु होत आहे. दक्षिणेत सौभाग्य ग्रुपचे हर्षवर्धन रेड्डी यांनी त्याच्या पोल्ट्रीमध्ये प्रथम अशी अंडी उत्पादित केली. त्यासाठी त्यांनी सतत सहा वर्षे संशोधन केले होते. हि अंडी अतिशय पौष्टिक आहेतच पण त्यात अनेक रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती आहे. हि अंडी सामान्य अंड्याच्या तुलनेत महाग आहेत. एका अंड्याची किंमत २२ रु. पडते तरीही यांना प्रचंड मागणी आहे.या अंड्यांचा रंग गुलाबी असतो. आयुरएग नावाने तीबंगलोर, चेन्नई बाजारात मिळतात.

आता उत्तर भारतात सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठात या अंड्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या विषयी डॉ. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार यात कोंबड्यांना आहार देताना मका, बाजरी, डाळी याचबरोबर ४० प्रकारच्या वनौषधी दिल्या जातात.त्यात हळद, लसून याचाही समावेश केला जातो. त्यामुळे कोंबड्या जी अंडी देतात त्यात रोगप्रतिकार शक्ती वादाविणारी द्रव्ये तयार होतात.

ही आणि ओमेगा थ्री फॅटी अॅसिडने परिपूर्ण असतात यामुळे हृद्य आणि मेंदू स्वस्थ राहतात तसेच कुपोषण, रक्तक्षय, कॅन्सर यांना प्रतिरोध होतो तसेच हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. त्यामुळे या अंड्यांना चांगली मागणी येत आहे. याचा थेट फायदा कोंबडी पालन हा शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बंधूना होणार असून त्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment