काही दिवसात येणार येणार अशी चर्चा असलेला ५१२ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन हुवाईने लाँच केला असून त्याची घोषणा पी २० लाँचिंग बरोबर करण्यात आली. ५१२ जीबीचा हा लक्झरी फोन पोर्शे डिझाईनसह असून कंपनीचा आत्तापर्यंतचा सर्वात महाग फोन आहे. मेट आरएस नावाने हा फोन आणला गेला आहे. याचे बेस मॉडेल ६ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजचे आहे तर टॉप एंड मॉडेल ६ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोरेज सह आहे.
हुवाईचा ५२१ जीबीचा, पोर्शे डिझाईनचा स्मार्टफोन लाँच
बेस मॉडेलची किंमत १,३६,५२३ रुपये तर टॉप एंड मॉडेलची किंमत १,६८,७४३ रुपये आहे. या फोनला ६ इंची टू के स्क्रीन कर्व्ड ग्लास सह दिला गेला आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला असून कॅमेरा सेटअप मध्ये ४० एमपी आरजीबी सेन्सर, २० एमपी मोनोक्रोम, ८ एमपी टेलीफोटो लेन्स सह थ्री एक्स ऑप्टीकल झूम सुविधा आहे. सेल्फी कॅमेरा २४ एमपीचा आहे. रेड आणि ब्लॅक अश्या दोन रंगात तो उपलब्ध आहे. हा फोन वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.