केंद्र सरकारने नाकारली ‘गुगल स्ट्रीट व्ह्य़ू’ला परवानगी


नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून प्रसिद्ध शहरे, पर्यटन स्थळे, पर्वत आणि नदी यांचा ३६० अंशामध्ये पॅनारोमिक आणि रस्ता पातळीवर चित्रांची माहिती देणाऱ्या गुगल स्ट्रीट व्हय़ूसाठी दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानुसार जुलै २०१५मध्ये गुगलने देशातील प्रसिद्ध शहरांमध्ये ३६० अंशाच्या कॅमेराचा वापर करत डेटा गोळा करण्यात येणार होता. पण सरकारकडून या प्रस्तावाला विरोध करण्यात आला अशी माहिती गृहराज्य मंत्री हंसराज गंगाराम अहिर यांनी लोकसभेत दिली.

गुगलचा देशातील प्रमुख स्थळांची माहिती गोळा करत ती ऑनलाईन जाहीर करण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारे अमेरिका, कॅनडा आणि अनेक युरोपियन देशांमध्ये माहिती गोळा करत ती ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येते. प्रायोगिक पातळीवर गुगलकडून ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार, वाराणसीचा नदीकाठ, नालंदा विद्यापीठ, म्हैसूर पॅलेस, तंजावर मंदिर, चिन्नास्वामी स्टेडियम यांचा डेटा ३६० अंशात गोळा करण्यात आला होता. या सेवेचा लाभ गुगल मॅप आणि गुगल अर्थवर घेण्यात येतो.

Leave a Comment