चीनची अंतराळ प्रयोगशाळा लवकरच पृथ्वीवर कोसळणार


बीजिंग – पुढील आठवडय़ात चीनची पहिली प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळू शकते. ही प्रयोगशाळा ३१ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान कधीही पृथ्वीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जून २०१३मध्येच तियानगोंग-१ नावाच्या या प्रयोगशाळेचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. या प्रयोगशाळेकडून मार्च २०१६ पासून कोणतीही माहिती मिळालेली नाही. ही प्रयोगशाळा पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी कोसळेल हे अचूकपणे सांगता येणार नाही. पृथ्वीला धडक देण्याच्या २ तासांअगोदरच याचा अनुमान लावता येऊ शकतो, असे चीनच्या अंतराळ तज्ञाने सांगितले. चीनची ही प्रयोगशाळा अंतराळात स्वतःचे स्थानक स्थापन करण्यासंबंधी त्याच्या प्रकल्पाचा भाग आहे. २०२२पर्यंत अंतराळ स्थानक उभारण्याची चीनची योजना आहे. सप्टेंबर २०११मध्ये चीनने तियानगोंग-१ ला प्रक्षेपित केले होते. ही प्रयोगशाळा पृथ्वीपासून २१६.२ किलोमीटरवरील कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे.

Leave a Comment