फेसबुकसारख्या सोशलसाईटसाठी आनंद महिंद्र देणार आर्थिक मदत


उद्योजक आनंद महिंद्र यांनी फेसबुकप्रमाणे सोशल साईट बनविणाऱ्या भारतीय स्टार्टअप साठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला असून तसे त्यांनी ट्विटर अकौंटवर आवाहन केले आहे. यात महिंद्र म्हणतात फेसबुक सारखी मोठ्या प्रमाणवर वापर होऊ शकेल अशी सोशल साइट भारतीय युवकांनी बनवावी त्यात गुंतवणूक करण्यास आम्ही तयार आहोत.

या साईटचे व्यवस्थापन पूर्णपणे व्यावसायिक पातळीवर केले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. फेसबुकच्या डेटा लिक प्रकरणात दोषी असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने युजरची जाहीर माफी मागितली असून तुमची माहिती सांभाळून ठेवणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडत नसू तर तुम्हाला सेवा देण्यासाठी आम्ही लायक नाही असे शब्द वापरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्र यांच्याकडून करण्यात आलेले आवाहन विशेष महत्वाचे ठरले आहे.

Leave a Comment