देशातील विमानतळांवर पतंजली स्टोर्स सुरु होणार


देशातील सर्व विमानतळांवर लवकरच रामदेवबाबांच्या पतंजली आयुर्वेदची स्टोर्स सुरु होत असून त्यासाठी जेएचएस सवेन्गार्ड लॅबोरेटरिज या दिल्लीच्या कंपनीबरोबर सहकार्य करार केला गेला आहे. ही कंपनी तोंडदेखभाल संदर्भातील उत्पादने बनविते. या उपक्रमातून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना पतंजली उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सध्या असे एक स्टोर दिल्लीच्या इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु झाले आहे.

जेएचएसचे अध्यक्ष निखील नंदा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, येत्या २ वर्षात देशातील विमानतळांवर अशी १०० स्टोर्स सुरु केली जात आहेत. त्याचे काम सुरु झाले आहे. पतंजलीने व्यवसायात पदार्पण केल्यानंतर २०१२ साली त्याची उलाढाल ४५३ कोटी होती ती २०१७ मध्ये २० पट वाढून १०,५६१ कोटींवर नेली आहे. पतंजली शाम्पू, पेस्ट, साबण, बिस्किटे, नुडल्स,पाणी आणि अन्य दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू विकते.

Leave a Comment