अॅपलचे स्वस्त आयपॅड लाँच


अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या इव्हेंट मध्ये अॅपलने त्यांचे नवे आयपॅड लाँच केले आहे. युवा वर्गात क्रेझ असलेल्या आयपॅडची ही नवी आवृत्ती खास विद्यार्थी वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन बनविली गेली आहे. आत्ता पर्यंत सादर झालेल्या आयपॅड मॉडेल मधील हे सर्वात स्वस्त आहे.

या आयपॅडला ९.२ इंची स्क्रीन दिला गेला असून ते अॅपल पेन्सिलला सपोर्ट करते. ३२ जीबी वायफाय ची किंमत ३२९ डॉलर्स म्हणजे २१३३८ रु.असली तरी विध्यार्थ्यांना ते १९३९१ रुपयात मिळणार आहे. ३२ जीबी वायफाय प्लस सेल्युलरची किंमत ४५९ डॉलर्स असून ही दोन्ही मॉडेल भारतात २८ एप्रिलपासून अनुक्रमे २८ हजार आणि ३८,६०० रुपयात मिळणार आहेत.


या आयपॅडला पुढे टच आयडी दिला गेला असून फेसटाइम फ्रंट कॅमेरा व ८ एमपीचा रिअर कॅमेरा एलईटी सपोर्टसह आहे. रिअर कॅमेरा फुल एचडी व्हिडीओ क्षम असून जीपीएस, कंपास आणि अन्य काही अॅप्स दिली गेली आहेत. विद्यार्थ्यांना ५ ते २०० जीबीपर्यत आयक्लाउड स्टोरेज मिळणार आहे.

Leave a Comment