नोकियाने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन


नवी दिल्ली- अखेरीस भारतात विक्रीसाठी नोकिया १ हा स्मार्टफोन उपलब्ध झाला आहे. नोकियाचा हा अँड्रॉइड ८.१ ओरियो (गो एडिशन) वर चालणारा पहिला स्मार्टफोन असून हा स्मार्टफोन यावर्षी बार्सिलोनात मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाचे लायसन्स असणाऱ्या एचएमडी ग्लोबलने लॉन्च केला होता. नोकिया १ हा अँड्रॉइड ओरियोवर चालणाऱ्या काही निवडक मोबाइलपैकी एक मोबाइल आहे. दरम्यान अँड्रॉइड गो इकोसिस्टम ग्राहकांना या स्मार्टफोनचा उत्तर अनुभव मिळेल, असा दावा करत आहेत. गुगल अॅप्स आणि सव्हिसेसचे लाइटवेट वर्जन या फोनमध्ये आहेत. नोकिया १ हा मोबाइल कंपनीचा आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्तातील हॅण्डसेट आहे.

भारतात नोकिया १ हा स्मार्टफोन ५ हजार ४९९ रूपयांना मिळेल. ग्राहकांना हा स्मार्टफोन देशभरातील प्रत्येक मोबाइलच्या दुकानात विकत घेता येणार असून हा फोन डार्क ब्लू आणि वॉर्म रेड अशा दोन रंगामध्ये मिळतो आहे. याशिवाय या फोनवर टेलिकॉम सर्विस प्रोवायडर रिलायन्स जिओने २२०० रूपयांच्या कॅशबॅकची ऑफर दिली आहे. कॅशबॅकनंतर हा फोन ग्राहकांना ३२९९ रूपयांना मिळेल.

Leave a Comment