तुम्ही पाहिली आहे का पाकिस्तानातील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर?


सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. एक पाकिस्तानी ट्रान्सजेंडर यामध्ये न्यूज अँकरींग करताना दिसत असून एका ट्रान्सजेंडरला पाकिस्तानातील एका खासगी वृत्त वाहिनीने न्यूज अँकर बनवले आहे. तिचे माविया मलिक असे नाव आहे. यासंदर्भातील माहिती पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार शिराज हसन यांनी ट्विट करून दिली. आपल्या ट्विटमध्ये शिराज यांनी माविया मलिक – पाकिस्तानातील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर असे लिहिले आहे.

यासाठी ट्विटरवर अनेकांनी मावियाचे अभिनंदन केले आहे. तसेच, वृत्तवाहिनीचे हे चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे. मावियाला अँकरींग करण्याची संधी दिल्याने वृत्त वाहिनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. माविया मलिक ही लाहोरची राहणारी असून ती पदवीधर आहे. तिला लहानपणापासूनच न्यूज अँकर बनण्याची इच्छा होती. पाकिस्तानमध्ये १० हजाराहून जास्त ट्रान्सजेंडर आहेत.

मावियाने न्यूज अँकर बनण्यापूर्वी मॉडलिंग केले होते. तिच्या म्हणण्यानुसार ती पाकिस्तानातील पहिली ट्रान्सजेंडर मॉडेलही आहे. तिला कोहेनूर न्यूजच्या रिलॉन्च बद्दल कळताच तीदेखील मुलाखत देण्यासाठी गेली. तेथे तिची निवड करण्यात आली व त्यानंतर ट्रेनिंग सुरू झाले. न्यूज अँकर बनल्यावर तिच्यासोबत कोणताही भेदभाव झाला नसल्याचे तिचे म्हणणे आहे.

Leave a Comment