आजपासून विजय माल्ल्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई


नवी दिल्ली – लिकर किंग विजय माल्ल्याची संपत्ती जप्त करायला मंगळवारपासून अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सुरुवात केली जाणार आहे. ही कारवाई कलम ८३ नुसार केली जाणार आहे.

फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यासंदर्भातील कलम ८३ नुसार फरार झालेल्या गुन्हेगारीची संपत्ती जप्त केली जाते. दिल्ली न्यायालयाने तत्पूर्वी समन्सची दखल न घेतल्याने माल्ल्याला गुन्हेगार घोषित केले होते. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, माल्ल्याने १९९६, १९९७ आणि १९९८ मध्ये ब्रिटीश कंपनीला आणि काही देशांना फॉर्म्यूला वन वर्ल्ड चॅम्पियनशीमध्ये किंगफिशरचा लोगो दाखवण्यासाठी २ लाख डॉलर दिल्याचा आरोप केला आहे. तपास संस्थेने म्हटले आहे, की मल्याने हे पैसे देताना रिझर्व बँक ऑफ इंडीयाची परवानगी घेतलेली नाही. तथापी त्याने एपईआरएच्या नियमांचेही उल्लंघन केले आहे.

Leave a Comment