ओप्पोचा एफ ७ हायटेक फिचरसह लाँच


ओप्पोने त्यांचा नवा एफ ७ हा स्मार्टफोन बाजारात आणला असून सध्या मार्केटमध्ये असलेल्या कॅमेरा फोन मध्ये तो सर्वात दमदार फोन ठरतो आहे. या फोनला १६ एमपीचा प्रायमरी कॅमेरा आहे तर सेल्फी साठी २५ एमपीचा मस्त कॅमेरा दिला गेला आहे. यातून काढलेला फोटो कोणत्याची डीएसएलआर कॅमेऱ्यातून काढलेल्या फोटोपेक्षा अधिक चांगला येतो. कंपनीचा दावा आहे की हा कॅमेरा २९६ फेशियल रेकग्निशन पॉइंट स्कॅन करून क्लीअर फोटो काढतो.

या फोनला ६.२ इंची फुल एचडी स्क्रीन, ओरिओ ८.१ ओएस, ६४ ,१२८ जीबी स्टोरेज, ते मायक्रो कार्डचा सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची क्षमता, ४ आणि ६ जीबी रॅम, मल्टीविंडो बेस्ड मल्टी टास्किंग सुविधा दिली गेली आहे. डायमंड ब्लॅक, डार्क ब्लू आणि सनराईज रेड अश्या तीन रंगात तो मिळणार आहे.

२ एप्रिलला या फोनचा ऑफलाईन फ्लॅश सेल होणार असून ७७७ विशेष स्टोअरमधून त्याची १० हजार युनिट विकली जाणार आहेत. आयसीआयसीआय च्या क्रेडीट कार्ड होल्डरन त्यावर ५ टक्के जादा डिस्काऊंट शिवाय जिओ कडून ४ जीचा १२० जीबी देता फ्री मिळणार आहे. ४ जीबी ६४ जीबी स्टोरेजसाठी २१९९० तर ६ जीबी १२८ स्टोरेज साठी २६९९० रुपये अशी त्याची किंमत आहे.

Leave a Comment