सोन्याचा शाईने लिहिलेले रामायण


रामनवमीच्या मुहूर्तावर गुजराथ मधील लुहार फालीया गावात २२२ तोळे सोन्याच्या शाईने लिहिलेले रामायण भाविकांच्या दर्शनासाठी ठेवले गेले होते. १९ किलो वजनाचे हे रामायण १९८१ साली रामअसन यांचे पणजोबा रामभाई गोकर्णभाई यांनी लिहून घेतले आहे. जगातील या प्रकारचे हे पहिलेच रामायण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे रामायण तयार करण्यासाठी ९ महिने ९ तास लागले होते. दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर ते लिहिले गेले. त्यासाठी १२ जण जण काम करत होते. यात ५३० पाने असून त्यासाठीचा कागद जर्मनीतून आणला गेला होता. यात १० किलो चांदी, पाचू, ४ हजार हिरे, माणके याचा वापर केला गेला आहे. या रामायणाची किंमत कोट्यावधी रुपये आहे. मुखपृष्ठावर शिव, हनुमान आणि गणेश याच्या चांदीच्या प्रतिमा आहेत तर मलपृष्ठ ५ किलो चांदीपासून बनविले गेले आहे.

यात ५ कोटी वेळा रामनाम आले असून अक्षरांना झळाळी यावी यासाठी हिऱ्यांचा वापर केला गेला आहे. दर रामनवमीला त्याची पूजा केली जाते. वर्षातून रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि दिवाळी पाडवा या दिवशी ते भाविकांना दर्शनासाठी ठेवले जाते.