जिओचा आता ऑनलाईन संगीताचा धमाका


टेलिकॉम क्षेत्रात रेकोर्डचे नवनवी क्षितिजे गाठल्यावर रिलायंस जिओ आता संगीत तेही ऑनलाईन संगीतात धमाका माजविण्यास सिद्ध झाले आहे. रिलायंस जिओचे प्रमुख आकाश अंबानी यांनी या संदर्भातली घोषणा नुकतीच केली आहे. त्यानुसार जगातील सर्वात मोठे म्युझिक अॅप सावन यांच्याशी जिओने करार केला आहे. या दोघांच्या सहयोगातून रीलायन्स डिजिटल म्युझिक सर्विस देणार आहे. या कंपनीचे बाजार मूल्य १ अब्ज डॉलर्स असून जिओची मार्केट व्हॅल्यु ६७० दशलक्ष डॉलर्स आहे. याशिवाय विलिनीकरणानंतर रिलायंस १०४ दशलक्ष डॉलर्स कॅश गुंतविणार आहे.

ग्राहकांना विनाअडथळा डिजिटल मनोरंजन सेवा मिळावी हा या कंपनीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून आकाश अंबानी म्हणाले, सावनचे सहसंस्थापक ऋषी मल्होत्रा, परमदीपसिंग आणि विनोद भट संचालक म्हणूनच काम करतील. रिलायंस बरोबर भागीदारी केल्यामुळे जगभर प्रचंड वेगाने वाढत असलेल्या मिडिया प्लॅटच्या दिशेने वाटचाल करणे सुलभ झाल्याचे ऋषी मल्होत्रा यांनी सांगितले.

Leave a Comment