आपल्या आहारामध्ये लिंबू समाविष्ट करा


लिंबाला आहारशास्त्रामध्ये ‘सुपर फूड’चा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या आवडत्या खाद्य पदार्थांची चव वाढविण्यास लिंबू सहायक आहेच, पण त्या शिवाय ह्याचे सेवन आरोग्याला अतिशय फायदेकारकही आहे. लिंबाच्या रसामध्ये असणारे फ्लावेनॉइड्स अँटी ऑक्सिडंट्स ने युक्त असून, ह्या रसाच्या सेवनामुळे अएंक आजारांपासून शरीराला संरक्षण मिळते. लिंबाचा रस हा ‘अॅसिडीक’ असाल, तरी अल्कलीचे उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे शरीराची ‘ph’ लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते.

लिंबामध्ये कर्करोग प्रतिरोधक तत्वे आहेत. ह्या तत्वांना सिट्रस लिमीनॉइड्स म्हटले जाते. ह्या तत्वांमुळे शरीरातील सामान्य कोशिकांचे कर्करोगबाधित कोशिकांमध्ये परिवर्तन होण्याला आळा बसतो. तसेच पचनशक्ती उत्तम राखण्याकरिता देखील लिंबू सहायक आहे. त्यामुळे सकाळी उठ्लानंतर चहा किंवा कॉफीच्या सेवना ऐवजी कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस घालून त्याचे सेवन करावे. त्यामुळे शरीराला क जीवनसत्व मिळते, व पचनतंत्रदेखील सुरळीत चालू राहते. परिणामी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

जर सर्दी-खोकल्यामुळे किंवा तत्सम इन्फेक्शनमुळे घसा दुखत असेल तर कोमट पाण्यामध्ये मधाबरोबर लिंबाचा रस घ्यावा. त्याने घशातील इन्फेक्शन कमी होऊन घसादुखीमध्ये आराम पडतो. लिंबाचा रस दररोज सेवन केल्याने शरीरामध्ये सायट्रेट लेव्हल वाढतात. त्यामुळे किडनीमध्ये कॅल्शियम डीपॉझिट झाल्याने होणारे किडनी स्टोन होण्यास आळा बसतो. तसेच लिंबाच्या रसामध्ये पेक्टिन नामक तत्व वजन घटविण्यास सहायक आहे. पेक्टिन हे सोल्युबल फायबर वजन घटविण्यास सहायक असते.

अनेकदा डास चावल्यामुळे किंवा कुठला किडा चावल्याने शरीरावर लहान फोड येतात, आणि त्याठिकाणी सतत खाज सुटू लागते. अश्यावेळी त्या जागी लिंबाचा रस लावल्याने खाज कमी होते. जिथे खाज सुटत असेल, तिथे लिंबाचा रस लावावा, व रस वाळल्यानंतर धुवून टाकावा. ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास होत असेल त्यांनी अलाशीच्या बियांमध्ये ( जवसामध्ये ) लिंबाचा रस घालून त्याचे सेवन करावे. याने बद्धकोष्ठाचा त्रास दूर होण्यास मदत मिळेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment