फेसबुकने केला हिमाचलच्या युवकाचा सन्मान… पण का?


बिलासपूर – फेसबुकने ५०० डॉलर देऊन हिमाचल प्रदेशमधील रोडा भागातील एका युवकाचा सन्मान केला असून या युवकाचे नाव शंशाक मेहता असे आहे. फेसबुकच्या सेक्युरीटी संबंधित एक दोष त्याने शोधून काढल्यामुळे त्याचा हा सन्मान करण्यात आला आहे.

याबाबत शंशाकने दिलेल्या तक्रारीनंतर कंपनीने चूक कबूल केली असून कंपनीने त्याला ५०० डॉलरचा पुरस्कारही दिला आहे. शंशाक मेहताने म्हटले आहे, की सायबर सुरक्षेवर तो गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहे. यावेळी त्याला दिसून आले, की फेसबुक साईटवर लॉगिन केल्यानंतर शो पासवर्ड ऑप्शन येते. हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक होते. शंशाकने ही चूक फेसबुकच्या अधिकाऱ्यांनाही लक्षात आणून दिली.

Leave a Comment