समुद्राखालील विष्णूमंदिरचे गूढ उलगडले


जगात मुस्लीमबहुल देश असलेल्या इंडोनेशियाच्या बाली बेटावर आजही मोठ्या प्रमाणात हिंदू वस्ती आहे. या चिमुकल्या आणि सुंदर बेटावर आजही वर्षभर कोणताना कोणता हिंदू सण साजरा होत असतो. याच बेटावर समुद्राखाली सुमारे ५ हजार वर्षपूर्वीचे पाण्यात लुप्त झालेले विष्णूमंदिर आणि त्यातील मूर्ती असल्याचे सांगितले जात होते. नॉर्थवेस्ट बळीच्या पेमुतेरण बीच जवळ समुद्राखाली ९० फुट हे अवशेष आहेत असे सांगितले जात होते.

मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात या संबंधीची खरी माहिती समोर आली आहे. येथे समुद्राखाली मूर्ती, मंदिराचा दरवाजा आहे हे खरे असले तरी हे प्राचीन काम नाही तर प्रत्यक्षात ती कृत्रिम रीफ असून एका प्रोजेक्ट नुसार ती बांधली गेली आहे. समुद्राच्या जमिनीवर हे बांधकाम समुद्री जीवांचा अधिवास म्हणून उभारले गेले आहे. ऑस्ट्रेलियन संस्थेने या साठी निधी पुरविला आहे.


हा स्थानिक स्कुबा डायविंग स्पॉट आहे. इंडोनेशियाच्या सांस्कृतिक मंत्रालय, अॅक्वेटिक आर्कियो विभाग संचालक सूर्या हेल्मी यांनी हे प्राचीन मंदिर असल्याची अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, या ठिकाणी समुद्री जमिनीवर अनेक मोठ्मोठे दगडी पुतळे आहेत. चार मीटर लांबीचे मंदिर द्वार आहे. येथे विष्णू, देवी आणि बौध्द याचेही अनेक पुतळे आहेत. आणखी काही पुतळे दुसऱ्या जागी आहेत. पर्यटकांना प्राचीन दृश्ये डायविंगचा आनंद घेताना पाहता यावीत यासाठी हि सोय केली गेली आहे.

Leave a Comment