हुवेई आणणार ५१२ जीबीचा स्मार्टफोन?


चीनी संस्था टेनाच्या वेबसाईटवर आलेल्या माहितीनुसार लवकरच फोनचे एक नवे मॉडेल बाजारात सादर होत असून त्याला संगणकाइतकी म्हणजे ५१२ जीबी मेमरी आणि ६ जीबी रॅम दिली जात आहे. इंटरनॅशनल टेक साईटच्या माहितीनुसार हुवावे त्याच्या पी २० सिरीज मधला पुढचा हायटेक फोन आणत असून तो हाच फोन आहे. बाजारात हा फोन कधी येणार याचा खुलासा झालेला नाही.

मात्र ५१२ जीबी स्टोरेजचा हा फोन आयफोन एक्स पासून पारंपारिक संगणकांना टक्कर देणारा असेल. कारण त्याला देण्यात येत असलेल्या हेवी मेमरीमुळे युजर ऑफिसचे सारे काम या फोनच्या सहाय्याने कुठेही बसून करू शकेल. जगातला हा सर्वाधिक मेमरीचा फोन असेल असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. या फोनमध्ये संपूर्ण दिवसभराचा एचडी व ४के व्हिडीओ रेकोर्ड करता येईल. विशेष म्हणजे सॅमसंग ने नुकतेच स्मार्टफोन साठी ५१२ जीबी मेमरी बनविण्याच्या कामाची सुरवात केली असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळ सॅमसंग हा भाग हुवाईला पुरविणार काय याचीही चर्चा जोरात आहे. सध्या बाजारात १२८ जीबी स्टोरेजचेच स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Leave a Comment