फक्त ३४० रुपयांत विकली जाते फेसबुक लॉग इनची माहिती


मुंबई : अमेरिका, इंग्लंड आणि भारतात फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने रान उठवले असतानाच आणि फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने त्याबद्दल माफीही मागितली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ ३४० रुपयांना आपल्यासाठी अमूल्य असणारे फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स विकले जात असल्याचे एका कंपनीने निदर्शनास आणले आहे.

५ कोटी फेसबुक युजर्सचे लॉग इन डिटेल्स अमेरिकेतील निवडणुकीसाठी चोरण्यात आले होते. वरील किमतीला ही माहिती जर विकली असेल तर त्याचे मूल्य जवळपास १७०० कोटी रुपये एवढे आहे.

आपण जे फेसबुकसोबत अ‍ॅप अटॅच करतो, एखाद्या फोटोशी तुलना करण्यासाठी, स्वभावाविषयी जाणून घेऊन ते पोस्ट करण्यासाठी आपण जिथे लॉग इन करतो, ही डेटाचोरी अशा अ‍ॅपच्या माध्यमातून होऊ लागली आहे. डेटाचोरी बिटनमधील रिसर्च कंपनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आतापर्यंत अशा असंख्य कंपन्यांनी फेसबुकवरून डेटा चोरला आहे. डार्क वेब मार्केटमध्ये जिथे कोणतेच वैध व्यवहार होत नाहीत, तिथे तुमचा हा डेटा जाहिरातदारांना, रिसर्च कंपन्यांना विकला जातो. ड्रीम, पॉइंट आणि वॉल स्ट्रीट मार्केट अशा तीन डार्क वेब मार्केटचा अभ्यास एका कंपनीने केला आहे.

Leave a Comment