ऑक्टोबरमध्ये होणार चांद्रयान-२चे प्रक्षेपण


चेन्नई – ऑक्टोबर महिन्यापर्यंत चांद्रयान-२चे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली. तज्ज्ञांनी काही गोष्टींचे परीक्षण करण्याचा सल्ला दिल्यामुळे प्रक्षेपण उशीरा होणार असल्याचे शिवन यांनी सांगितले.

इस्रोतर्फे एप्रिल महिन्यात पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी अंतराळ यान उड्डाण भरणार असल्याची माहिती, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व अंतराळ विभागाचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी १६ फेब्रुवारीला दिली होती. भारताचा चंद्रयान-२ हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चांद्रयान-२ हे पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेले मिशन आहे. या अवकाश यानाचे वजन ३ हजार २९० किलो असून हे यान चंद्राच्या चार बाजूंना फिरून माहिती गोळा करण्याचे काम करेल.

Leave a Comment