‘डेबिट कार्ड डिक्लाईन चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांना लुटत आहेत बँका


मुंबई : रोखरहित आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण मोदी सरकारने स्वीकारले असले तरी मात्र बँका ग्राहकांना ‘डेबिट कार्ड डिक्लाईन चार्जेस’च्या नावाखाली लुटत आहेत. बँका खात्यावर पुरेसे पैसे नसताना कार्ड स्वाइप केल्यास १७ ते २५ रुपये चार्जेस लावत असून, त्यावर जीएसटीही वेगळा लावला जात आहे.

एका स्वाइपसाठी एसबीआयकडून १७ रुपये ग्राहकाच्या खात्यातून कापले जातात. विशेष म्हणजे खात्यावर असलेल्या पैशापेक्षा चुकून जास्त पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावरही हे चार्जेस लावले जातात, तसेच हे चार्जेस दुकानात खरेदीच्या वेळी पॉइंट ऑफ सेलवर स्वाइपच्या वेळीहीलावले जातात. या शुल्कापोटी एचडीएफसी बँक व आयसीआयसीआयकडून २५ रुपये कापले जातात. बँकांच्या मते धनादेशाचा अनादर झाल्यास त्यावर मोठे दंडात्मक शुल्क लागते. ईसीएस अपयशी झाल्यासही शुल्क लावले जाते. हे शुल्क समर्थनीय असेल, तर डेबिट कार्ड डिक्लाईन शुल्कही समर्थनीयच आहे.

Leave a Comment