या मंदिरात आजही अश्वत्थामा करतो दुर्गेची पूजा


महाभारत कालीन संस्कृतीशी यमुना नदीचे नाते जोडलेले आहे. यमुनेच्या तीरावरचे उत्तरप्रदेश राज्य त्यामुळेच महाभारत काळातील अनेक वस्तू, मंदिरे, कथांचे माहेरघर बनले आहे. याच राज्यात इटावाजवळ असलेले भेहडवाली मैया मंदिर असेच महाभारताशी जोडलेले असून या मंदिरात रोज पाहते महाभारतातील वीर चिरंजीव अश्वत्थामा गुप्तरुपात देवीची पूजा करतो असा विश्वास आहे. नवरात्र काळात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असेत. हे कालीवाहन मंदिर देवीचे सिद्धपीठ मानले जाते.


येथील पुजारी गेली ४० वर्षे मंदिरात सेवेत आहेत. ते सांगतात दररोज रात्री मंदिर बंद केल्यानंतर पहाटे ते स्वच्छ धुतलेले असते. शिवाय गाभारा कुलुपबंद असतो आणि पाहते उफ्हाडला जातो तेव्हा डेव्हीच्या मूर्तीवर ताजी फुले घालून पूजा केलेली आढळते. अनेकदा प्रयत्न करूनही हे कोण करते ते कळू शकलेले नाही. चिरंजीव अश्वत्थामा ही पूजा रोज करतात असा समज आहे. वास्तविक हे मंदिर चंबळ खोऱ्यातील क्रूर डाकूंचे श्रद्धास्थान. पोलिसांचा पहारा चुकवून हे डाकू येथे त्यांच्या टोळीसह येऊन पूजाअर्चा करत. त्याच्या नावाच्या घंटा आणि झेंडे दिसले कि ते येथे पूजा करून गेल्याचे समजत असे.

या मंदिरात प्राचीन स्वरुपात महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी मूर्ती विराजमान आहेत. या मूर्ती १०-१२ व्या शतकातील आहेत. डाकू जमातीवर निर्माण झालेल्या अनेक चित्रपटांचे शुटींग येथे झाल्याचे सांगतात.

Leave a Comment