आयफोन एक्सपेक्षा गॅलॅक्सि एस ९ चा उत्पादन खर्च कमी


सॅमसंग ने त्याचे दोन नवे फ्लॅगशिप फोन गॅलॅक्सि एस ९ आणि एस ९ प्लस बाजारात पेश करून त्याची विक्री सुरु केली आहे. त्यानंतर हे फोन तयार होण्यासाठी प्रत्यक्षात किती पैसे खर्च केले जातात याचा अहवाल टेक इनसाईटने जाहीर केला आहे. त्यानुसार हे फोन अॅपल आयफोन एक्स पेक्षाही खूपच कमी किंमतीत बनतात हे सिद्ध झाले आहे. या फोनसाठी वापरले गेलेले सुटे भाग व त्याच्या किमती यावरून उत्पादन खर्चाचा अंदाज दिला गेला आहे.

एस ९ ची बाजारातील किंमत ५७९०० तर एस ९ प्लस ६४९९० रुपये आहे. मात्र हे फोन प्रत्यक्षात २४ हजारात तयार होतात. म्हणजे उत्पादन खर्चाच्या तिप्पट दराने ते विकले जातात. एस ९ साठी ६.२ इंची स्क्रीन, ६ जीबी रॅ,, ओरीओ ८.० ओएस दिली गेली आहे. त्याच्याशी स्पर्धा असलेला आयफोन एक्स तयार होण्यासाठी ३५ हजार रु. खर्च येतो. विशेष म्हणजे आयफोनचा सर्वात महाग सुटा भाग त्याचा डिस्प्ले असून त्यासाठी ८० डॉलर्स खर्च येतो. हा डिस्प्ले सॅमसंग कडूनच अॅपल ला पुरविला जातो.

Leave a Comment