होय, आम्ही चुकलो; मार्क झुकेरबर्गची कबुली


सॅन फ्रॅन्सिस्को – केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकवरील पाच कोटी युजर्सचा तपशील दिल्याचा प्रकार समोर आला होता. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने अखेर या प्रकरणावर भाष्य केले आहे. आम्ही केंब्रिज अॅनाटिकल प्रकरणात चुका केल्या असून त्यामुळे आम्ही युजर्सच्या विश्वासाचा भंग केल्याचे झुकेरबर्गने म्हटले आहे.

आम्ही झालेल्या चुका सुधारण्यासाठी उपाययोजनादेखील राबवल्या आहेत. असे पुन्हा भविष्यात होऊ नये यासाठी आम्ही खबरदारी घेऊ असे आश्वासन त्याने दिले आहे. आम्ही यापूर्वीही डेटा सुरक्षित राहावा यासाठी प्रयत्न केले. मात्र आमच्या हातून चुका झाल्या. आता त्या सुधारण्याची आवश्यकता आहे, असे झुकेरबर्गने फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

परवानगीविना जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनाटिकल ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली आहे. या डेटाचा उपयोग २०१६ च्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आणि ब्रेक्झिटमध्ये करण्यात आला होता. राजकीय हेतूने वैयक्तिक डेटाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा खुलासा फेसबुकने करावा व डेटा उल्लंघनाबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी युरोपियन युनियन (ईयू) आणि ब्रिटीश अधिवेशकांनी केली आहे.

Leave a Comment