आयकर विभागाने कायम ठेवली ‘आधार’सक्ती


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने विविध सरकारी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान आणि विविध सेवा यांना ‘आधार’शी जोडण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही ‘आधार’सक्ती आयकर विभागाने कायम ठेवली असल्यामुळे आधार नोंदणी नसलेल्या करदात्यांना आयकर परतावा (टॅक्स रिटर्न) भरताना अडचणी निर्माण होत आहेत.

२०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सध्या ई-आयकर परतावा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवघ्या ९ दिवसांची मुदत त्यासाठी शिल्लक आहे. वित्त कायदा, २०१७ नुसार ई-आयकर परताव्यासाठी आधार क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक ठरविण्यात आले असल्यामुळे १२ अंकी आधार क्रमांकाची नोंदणी केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही. करदात्यांच्या तक्रारींची संख्या वाढल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment