आयबीएमने बनविला जगातील छोटा संगणक, किंमत फक्त ७ रु.


आयबीएम कंपनीने जगातील सर्वात छोटा संगणक बनविला असून त्याचा आकार मिठाच्या दाण्याएवढा आहे. हा संगणक येत्या पाच वर्षात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. या चिमुकल्या संगणकासाठी अवघे ७ रु. मोजावे लागणर असून हा छोटा संगणक अँटीफ्रॉड डिव्हाईस म्हणून कमालीची कामगिरी बजावेल असे सांगितले जात आहे.

प्रामुख्याने सप्लाय चेन मध्ये होणाऱ्या चोऱ्या, मालासोबतची छेडछाड या संगणकामुळे त्वरित ओळखता येणार आहे. यामुळे सध्या जगभरात खाद्यसुरक्षेबाबत जे महत्वाचे मुद्दे आहे ते दूर होऊ शकतील. या संगणकात एक चीप असून त्यातच प्रोसेसर, मेमरी व स्टोरेज दिले गेले आहे. तयार प्रोडक्ट मध्ये क्रीप्टोग्राफिक अँकर लावता येणार आहे. त्याच्या सहाय्याने संपूर्ण सप्लाय चेन मध्ये काही धोका अथवा गडबड असेल ती ताबडतोब लक्षात येऊ शकणार आहे. यामुळे ग्राहकांना भेसळीचा जो त्रास सहन करावा लागतो तो सोसावा लागणार नाही. सध्या जगभरात सप्लायचेन मध्ये होत असलेल्या गैरव्यवहारामुळे जगाला दरवर्षी ६०० अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागते आहे.

Leave a Comment