ट्विटरवर ट्रेंड होत आहे #DataChorCongress हॅशटॅग


मुंबई : आता फेसबुकच्या डेटा लीकचे लोण भारतापर्यंत येऊन पोहोचले असून फेसबुकचा डेटा ज्या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीने लीक केल्याचा आरोप केला जात आहे, २०१९सालासाठी काँग्रेसने त्या कंपनीला कॅम्पेनिंगसाठी निवडल्याचा आरोप केला जात आहे. ट्विटरवर काँग्रेसला #DataChorCongress हॅशटॅग वापरुन ट्रोल केले जात आहे.

#DataChorCongress हॅशटॅग ट्विटरवर वापरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. भारतीयांची माहिती काँग्रेसने परदेशी कंपनीला दिली असल्याचा आरोप करत, राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. विशेष म्हणजे, हा हॅशटॅग ऑल इंडिया ट्रेण्ड होत असल्याने त्याबद्दल सोशल मीडियावरील चर्चेला उधाण आले आहे.

दुसरीकडे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका आणि काँग्रेस पक्ष यांच्यात काय संबंध आहे, हे स्पष्ट करावे, असे म्हणत किती भारतीयांची माहिती काँग्रेसने केम्ब्रिज अॅनॅलिटिकासारख्या परदेशी कंपनीला दिली आहेत?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मिस्टर मार्क झुकरबर्ग, भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचे निरीक्षण काय असते, हे तुम्हाला चांगले ठाऊक असल्यामुळे जर भारतीयांची माहिती चोरली गेली, तर ते सहन केले जाणार नाही. आमच्याकडे तंत्रज्ञानविषयक कायदे कठोर असल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment