दुर्गेच्या नऊ रूपांचे दर्शन घडविणारे क्षेमामाता मंदिर


त्रिवेणी संगमामुळे हिंदूंसाठी प्रसिद्ध असलेल्या अलाहाबाद शहरात ऐन गर्दीच्या ठिकाणी देशातील एकमेव दुर्गेची नऊ रूपे दर्शविणारे क्षेमामाता मंदिर आहे. हे मंदिर अतिप्राचीन असून याचे उल्लेख पुराणातही आढळतात. देवी दुर्गा येथे चैत्री नवरात्रातील देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा स्वरुपात आहे. या मंदिराच्या नुसत्या दर्शनाने भाविकांच्या शारीरिक मानसिक व्यादीतून सुटका होते असा विश्वास आहे.

चैत्री आणि शारदीय नवरात्रात येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वर्षभर या मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीत देवीच्या मूर्तीचा शृंगार पाने आणि फुले यापासून केला जातो. प्रत्येक दिवशी देवी नव्या रुपात सजते. बँडबाजाच्या गजरात मातेच्या विभिन्न प्रतीकांचे निशाण चढविण्याची येथे प्रथा असून त्यामुळे देवी भाविकांवर प्रसन्न होते असा समज आहे.

Leave a Comment