फोटो शेअरिंग साईट इन्स्टाग्राम ने भारतात प्रथमच इन्स्टाग्राम अवार्ड घोषणा केली असून त्यात टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याची मोस्ट एन्गेज्ड सेलेब्रिटी म्हणून तर बॉलीवूड दिवा दीपिका पादुकोने हिने सर्वाधिक फोलोअर असलेली सेलेब्रिटी म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे.
विराट आणि दीपिका ठरले पहिले इंडिअन इंस्टाग्राम अवार्ड विजेते
विराटने अनुष्काबरोबर लग्न केल्यानंतर या साईटवर लोड केलेल्या फोटोना ४५ लाख लाईक व दीड लाख कॉमेंट मिळाले होते. त्यानंतर टाकलेल्या फोटोना ३३ लाख लाईक मिळाले आहेत. तर दीपिकाच्या फोलोअरची संख्या २ कोटी २४ लाख सून त्याखालोखाल प्रियांका चोप्रा २ कोटी २१ लाख फोलोअर संख्येवर आहे. आलीया आणि श्रद्धा कपूर यांचेही दोन कोटीपेक्षा अधिक फॉलोअर आहेत. त्यानाही २ कोटी फॉलोअर पूर्ण झाल्याबद्दल अवार्ड दिले गेले आहे.
फोर्ब्सच्या अहवालानुसार कोहलीने गतवर्षी इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी ३ कोटी २० लाख रुपयांची कमाई केली आहे. सोशल मिडीयावर कमाईत तो सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. अनेक देशात अशी अवार्ड इन्स्टाग्राम दरवर्षी घोषित करते, भारतात ती प्रथम केली गेली आहेत. जगभरात या साईटचे ८० कोटी फॉलोअर असून त्यातील ५ कोटी भारतात आहेत.