आता डीझेल मिळणार घरपोच- पुण्यापासून सुरवात


आजकाल आपण गर्दी टाळावी म्हणून आवश्यक वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यास प्राधान्य देतो. त्यात आता पेट्रोल पंपावरील गर्दी टाळण्याची सोय झाली असून ग्राहक आता घरपोच डीझेल मिळवू शकणार आहेत. सध्या ही सेवा पुणे शहरात सुरु झाली असून इंडिअन ऑइल कार्पोरेशन हि सेवा देत आहे. त्यांच्या ट्विटर अकौंटवर हि माहिती दिली गेली आहे.

काही दिवसापूर्वी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वाहनचालकांचा पेट्रोल पंपावर इंधन घेण्यासाठी जाणारा वेळ वाचवा म्हणून सरकार ग्राहकांना घरपोच इंधन पुरविण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार डीझेल घरपोच देण्याच्या सेवेला पेट्रोलियम व एक्सप्लोझीव सेफ्टी ऑर्गनायझेशनने मान्यता दिली आहे. पेट्रोलचा मानाने डीझेल कमी ज्वलनशील असल्याने सध्या डीझेल घरपोच दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. कालांतराने पेट्रोलसाठीही हि सेवा सुरु केली जाणार आहे.

Leave a Comment