अनिल अंबानीचा कमाईसाठी पोस्ट विभागाशी करार


प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांनी त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाचे सहकार्य घेतले असून देशातील १२ हजार पोस्ट ऑफिसेस बरोबर सहकार्य करार केला आहे. त्यानुसार डीटीएच सेवा देणारी रिलायंस ब्रॉडकास्ट कंपनी पोस्ट ऑफिस मधून सेट टॉप बॉक्स विक्री करणार आहे. अनिल अंबानी यांच्या आर कॉमवर ४५ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यासाठी डिसेंबर मध्ये त्यांचे मोठे बंधू मुकेश यांनी जिओसाठी हजारो कोटीचे डील करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती मात्र न्यायालयाच्या आदेशने हे डील होऊ शकलेले नाही.

नव्या करारानुसार महाराष्ट्र आणि गोवा पोस्ट विभागातील १२ हजार पोस्ट कार्यालयातून ५०० रु. भरून रिलायंस बिग टीव्ही सेटटॉप बॉक्स साहती प्रीबुकिंग करता येणार आहे. बिग टीव्हीने देशभरात ५ वर्ष्साठी मुफ्त ५०० फ्री टू एअर चॅनल १ वर्षाचे सब्स्क्रीप्शन भरून देण्याची योजना आखली आहे. त्यनुसार एचडी आणि एचईव्हीसी सेटटॉप बॉक्स ग्राहकांना प्रीबुकिंग मध्ये ४९९ रु.भरून घेता येणार आहेत. त्यानंतर आउटडोअर युनिट मिळाले की बाकी १५०० रु. भरून सर्व पेचॅनल दुसऱ्या वर्षी दर महा ३०० रु. रिचार्ज साठी भरून मिळतील व त्यानंतर दोन वर्षे रिचार्ज म्हणून १९९९ र. लॉयल्टी बेनिफिट दिला जाणार आहे.

Leave a Comment