जगातील पहिली थ्रीडी प्रिंटेड इलेक्ट्रिक कार लाँच


इटलीमधील इलेक्ट्रिक कार कंपनी ईएक्सव्ही आणि थ्रीडी प्रिंटींग मटेरीअल कंपनी पॉलीमेकर यांनी परस्पर सहकार्याने थ्रीडी प्रिंटेड इलेक्ट्रिक कार तयार केली असून तिचे नामकरण एलएसईव्ही असे केले आहे. हि कार चीनमध्ये लाँच करण्यात आली. जगभरात या कारची जोरदार चर्चा सुरु असून अनेक देशातून या कारसाठी १५ हजार युनिट प्रीबुक झाली असल्याचे समजते. चीनी बाजारात ही कार एप्रिल २०१९ पासून उपलब्ध होत आहे. या काळापर्यंत कंपनी या कारची २० हजार युनिट तयार करणार आहे.

या कारला बनविण्यासाठी अवघे तीन ते चार दिवस लागतात. ही दोन सीटर कार ४५० किलो वजनाची असून तिचा टॉप स्पीड आहे ताशी ७० किमी,. एका फुल चार्ज मध्ये ती १५० किमी जाऊ शकते. सामान्य कारला साधारण २ हजार सुटे भाग असतात, या कारला ४० ते ६० सुटे भाग आहेत. हाँगकाँगची स्टार्टअप कंपनी एक्सईव्हीचे या कार साठीचे डिझाईन सेंटर इटली मध्ये आहे आणि उत्पादन चीन मध्ये केले जात आहे. या कारची चासी, सीट आणि ग्लास सोडून सर्व भाग थ्रीडी प्रिंटींगच्या साहाय्याने पॉलीमेकर मटेरीअल ने बनविले आहेत. या कारची किंमत ८५०० युरो म्हणजे साधारण ७ लाख रुपये आहे. आशिया आणि युरोप मध्ये ती पुढच्या वर्षात लाँच केली जाणार आहे.

Leave a Comment