बग शोधा, १ कोटी ६२ लाख मिळवा- मायक्रोसॉफ्टची ऑफर


मायक्रोसॉफ्टने जानेवारी २०१८ मध्ये विंडोज संगणक व फोन मध्ये लावल्या गेलेल्या इंटेल, एएमडी, एआरएम प्रोसेसर मध्ये काही तृटी असल्याचे पूर्वीच जाहीर करताना या बगना स्पेक्ट्रा आणि मेल्टडाऊन अशी नावे दिली होती. हे बग दूर करण्यात अजूनही पूर्ण यश न आल्याने कंपनीने यावर सोल्युशन देणाऱ्यांसाठी १ कोटी ६२ लाख रुपयांची बक्षीस देऊ केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे बग आढळल्यानंतर कंपनीने युजर साठी सॉफ्टवेअर आणि ओएस पॅच जारी केले आहेत. मात्र बग काढण्याचे काम अद्यापि पूर्ण झालेले नाही. त्यासाठी कंपनीनी रेवार्ड नावाचा नवा प्रोग्राम लाँच केला असून त्यासाठी हे बक्षीस दिले जाणार आहे. विंडो सिस्टीम मध्ये जानेवारीत प्रथम या तृटी नजरेस आल्या होत्या. त्याचा परिणाम केवळ मायक्रोसॉफ्टच नव्हे तर अॅपल डिव्हायसेसवर ही झाला होता. हे बग्स येत्या काही दिवसात आणखी धोकादायक बनतील अशी भीती मायक्रोसॉफ्टचे सिक्युरिटी ग्रुप मॅनेजर फिलीप मिन्सर यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment