देशातील बँकातून करोडो रुपये बेवारस पडून


देशात सरकारी आणि खासगी बँकातून होत असलेले घोटाळे थांबाचे नाव घेत नसताना रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या अहवालात देशाच्या ६४ बँकातून पडून असलेल्या ११,३०२ कोटी रुपयांच्या रकमांना मालक नाहीत असे दिसून आले आहे. या रकमा सुमारे ३ कोटी खातेदारांच्या नावावर आहेत मात्र १० वर्षात या खात्यात कोणतीच उलाढाल न झाल्याने हि रक्कम बेवारस ठरली आहे. अहवालानुसार स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक या दोन बड्या बंकात अनुक्रमे १२६२ कोटी य १२५० कोटी तर अन्य सरकारी बंकट ७०४० कोटी रुपये बेवारस पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण भारतातील बँकांचा विचार केला तर हि रक्कम १०० लाख कोटींवर आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला गेल्या १० वर्षात ज्या खात्यातून व्यवहार होत नाहीत त्यांची माहिती द्यावी लागते. एचडीएफसी, आयसीआयसीआय सह अनेक खासगी बँकातूनही १४१६ कोटींच्या रकमांसाठी कुणी दावेदार नाही. त्यात आयसीआयसीआय मध्ये ४७६ कोटी तर कोटक महिन्द मध्ये १५१ कोटी रुपयांची रक्कम आहे.

Leave a Comment