जगातील सर्वात चिमुकली पेन्सिल


उत्तराखंड येथील प्रकाशचंद्र उपाध्याय यांनी जगातील सर्वात छोटी शिसपेन्सिल तयार केली असून ती पाहण्यासाठी लेन्सची मदत घ्यावी लागते. ५ मिमी लांब, ०.५ मिमी रुंद अशी ही पेन्सिल तांदळाच्या दाण्याएवढी आहे. लाकूड आणि शिसे यापासून ती बनविली गेली आहे.

४५ वर्षीय प्रकाश आर्टिस्ट आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार ही चिमुकली पेन्सिल तीन ते चार दिवसात बनते. काडेपेटीतील काडीचे लाकूड आणि एचबी लेडचा वापर त्यासाठी केला जातो. हि पेन्सिल आर्टिस्ट वर्ल्ड रेकोर्ड २०१७-१८ मध्ये सामील झाली असून ती रंगविण्यासाठी प्रकाश यांनी पांढरा काळा रंग वापरला आहे. यापूर्वी त्यांनी अनेक छोट्या वस्तू बनविल्या आहेत. त्यात सर्वात छोटे हस्तलिखित पुस्तक, सर्वात छोटे हनुमान चालीसा सामील असून त्याच्या सर्वात छोट्या चरख्याचा समावेश लिम्का बुक मध्ये झाला आहे. २०१६ नोवेंबर मध्ये त्यांनी सर्वात लांब पेंटिंग बनविले आहे.

Leave a Comment