भारतात सव्वा सहा लाख मुले करतात धुम्रपान


भारतात दर दिवशी तब्बल ६.२५ लाखांपेक्षा जास्त मुले धुम्रपान करतात, असे एका ताज्या पाहणीतून समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत चिंतादायक आहे, असे या पाहणी करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.

अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि अमेरिकेतीलच वाईटल स्ट्रॅटेजीज या संस्थांनी संपूर्ण जगभरात हे सर्वेक्षण केले असून ग्लोबल टोबॅको अॅटलास असे नाव त्याला देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात हा अहवाल प्रकाशित झाला आहे. या पाहणीच्या निष्कर्षांनुसार भारतात दर आठवड्याला १७,८८७ व्यक्तींचा मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे होतो. भारतातील धुम्रपानाची आर्थिकदृष्ट्या किंमत मांडायची झाल्यास ती १८ लाख १८ हजार ६९१ दशलक्ष रुपये एवढी होईल, असे संस्थेने म्हटले आहे. यामध्ये वैद्यकीय उपचारांचा खर्च, व्यक्तीची उत्पादनक्षमता नष्ट होणे तसेच लवकर मृत्यू होणे किंवा अपंगत्व येणे, अशा खर्चांचा समावेश आहे.

असे असले तरी, ज्या देशांमध्ये मानव विकास निर्देशांक मध्यम पातळीवर आहे त्या देशांच्या तुलनेत भारतात कमी मुले सिगारेट ओढतात. तसेच २०१६ या वर्षी भारतात ८२.१२ अब्ज सिगारेटचे उत्पादन झाले, असेही या अहवालात म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही