बंगलोर मधील लोक झोपतात लवकर


१६ मार्च हा जागतिक निद्रा दिवस म्हणून साजरा केला जातो. उत्पादकता आणि झोप यांचा थेट संबंध असल्याचे आता सिद्ध झाले आहेच. या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबई, बंगलोर या महानगरात २५ वर्षांवरील लोक किती झोप घेतात यावर एक सर्व्हेक्षण केले गेले आहे. त्यानुसार बंगलोर मध्ये लोक १० ते ११ या वेळात झोपी जातात तर मुंबईकर अर्धी रात्र उलटल्यावरच अंथरुणाला पाठ लावतात असे दिसून आले आहे.

कामाचा वाढलेला वेग, ताण, दगदग, स्पर्धा यामुळे एकंदर तरुण पिढीची झोप उडालेली आहे. कारण २५ पुढील वयाच्या अनेकांनी रात्री शांत झोप येत नसल्याचे अनुभव सांगितले आहेत. कामाचे स्वरूप ग्लोबल बनल्याने दिवसा, रात्री कधीही करावे लागणारे काम झोपेची नियमित वेळ बिघडवीत आहे. स्मार्टफोन चा आणि अन्य इलेक्ट्रोनिक उपकरणाच्या वाढता वापर झोपेवर आक्रमण करत असल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. बंगलोरकर वेळेवर झोपत असले तरी झोपेची गुणवत्ता थेथे कमी आहे. दिल्लीत ४० टक्के तर मुंबईत ५० टक्के लोक घड्याळाचा गजर लावतात असेही दिसून आले आहे.

चांगली झोप येण्यासाठी गाडी, उशी, पांघरून आणि खोलीतील वातावरण आरामदायी असणे आवश्यक असतेच पण बेडरूम मध्ये टीव्ही असेल तरी झोप शांत होत नाही. भारतात प्रत्येक ५ नागरिकांमागे एकाला झोपेची तक्रार आहे असेही दिसून आले आहे.

Leave a Comment