चला काश्मीरला, नयनरम्य ट्युलिप्स पाहायला


उन्हाळा सुरु झाला आहे आणि या काळात कुठे सहलीला जायचा बेत अखात असाल तर काश्मीर या भारताच्या नंदनवनाचा विचार जरूर करा कारण आता तेथे अतिसुंदर ट्युलिप फुलली आहेत. दरवषी येथे ट्युलिप महोत्सव साजरा होतो. यंदा तो २५ मार्च ते १५ एप्रिल या काळात होत आहे. काश्मीर मध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत पण ट्युलिप पहायची असतील तर या काळातच येथे जावे लागते.


ट्युलिपच्या बागा हे काश्मीरचे खास आकर्षण ठरले असून या काळात येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन येथे आहे. तीन लेव्हलवर असलेल्या या बागेत ट्युलिपच्या ४६ जाती आहेत. अनेक कारंज्यानी या उद्यानाची शोभा आणखी वाढविली आहे. पर्यटकांसाठी उत्तम सोयी सुविधा आहेतच त्याचप्रमाणे येथील फूड जॉइंट वर खास काश्मिरी बाकार्खणी, चोक्लेट केक, खाहावा( चहा) यांचा आस्वाद घेता येतो.


लाल, पिवळे, गुलाबी, पांढरे, केशरी, जांभळे असे अनेक रंग ट्युलिप मध्ये असून दूरवर पसरलेले त्याचे रंगीत पट्टे डोळ्याचे पारणे फेडतात. या बागेतून पाउल बाहेर काढणे किती अवघड असते याचा अनुभव प्रत्यक्ष घायला हवा. कडेला पसरलेल्या बर्फाच्छादित पर्वतरंगानी या बागेला जणू स्वर्ग बनविले आहे.

Leave a Comment