मसेराटीची घिबली लक्झरी कार भारतात लाँच


मसेराटीने इंडियाने त्याच्या घिबली या लक्झरी कारची तीन व्हेरीयंट भारतात लाँच केली असून कंपनीची हि बेस्ट सेलिंग सेदान २०१८ आहे. या कारच्या डीझेल मॉडेलची बेसिक किंमत एक्स शोरुम १ कोटी ३३ लाखांपासून सुरु होत आहेत. ग्रॅनस्पोर्ट व्हेरीयंट १कोति ३८ लाख तर ग्रॅनलुसो व्हेरीयंट १ कोटी ४२ लाखापासून उपलब्ध आहे. सर्व हायटेक फिचर सह पेट्रोल व्हर्जनहि कंपनीने प्रथमच सादर केले आहे.

या कारला नवीन अॅडाप्टीव्ह फुल एलईडी हेडलाईट, ग्लेअर फ्री मेट्रिक्स हायबीम, इंटिग्रेटेड व्हेईकल कंट्रोल सिस्टीम, स्काय हुक सस्पेंशन, इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंग दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ६.३ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे तशी २५० किमी. या क्कारला ३.० लिटरचे व्ही ६ इंजिन किले गेले आहे.