जगातली सर्वोत्तम एफ१८ हार्नेट विमाने खरेदीचा भारताचा विचार


लढाऊ विमान श्रेणीतील सर्वोत्कृष्ट आणि अतिशय पॉवरफुल अशी ओळख निर्माण केलेली एफ १८ हार्नेट विमाने खरेदी करण्याचा भारताचा विचार असल्याचे समजते. विशेष म्हणजे ही लढाऊ विमाने महागडी तर आहेतच पण अमेरिकेसारखा बलाढ्य देशही त्याची खरेदी करण्यास धजावलेला नाही. सध्या फक्त रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दलाकडे ही विमाने आहेत. अमेरिका सतत या विमानांची तारीफ करते मात्र त्याच्या किमती कमी करून द्याव्यात अशी अपेक्षाही करते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची ही विमाने अतिशय आवडती आहेत. बोईंग कंपनी ही विमाने बनविते. हे ट्वीन इंजिन फायटर जेट असून जादा इंधन बरोबर नेऊ शतके तसेच त्याचा वेग ताशी दोन हजार किमी आहे. हे विमान एअर टू एअर मिसाईल आणि एअर टू सरफेस वेपन नेऊ शकते. शिवाय रडारवर ते दिसत नाही. या एका विमानाची किंमत ५०० कोटी रुपये असून त्यात ग्राहकाच्या गरजेनुसार वेगळी किंमत आकारून बदल करता येतात.

रॉयटरच्या म्हणण्यानुसार भारताने या विमान खरेदीत स्वारस्य दाखविले असून पंतप्रधान मोदी यांनी एफ १६ व साब अबी या विमानाबरोबर या दोन इंजिन विमानाला पसंती दर्शविली आहे. भारताचे हवाई दल अधिक मजबूत बनविण्यासाठी १५ अब्ज डॉलर्स मोजण्याची तयारी सरकारने केली आहे.

Leave a Comment