कैरो मधील ‘झपाटलेले’ टेम्पल पॅलेस


कैरोच्या जवळील हिलीयोपोलीस येथून इजिप्तची राजधानी कैरोकडे जात असताना मंदिराप्रमाणे दिसणारी एक भव्य इमारत वाटेत दृष्टीस पडते. ह्या इमारतीला ‘ बॅरन्स पॅलेस ‘ या नावाने ओळखले जाते. गेली काही शतके इथे घडत असलेल्या अनेक रहस्यमयी, भीतीदायक घटनांमुळे ही इमारत ‘ झपाटलेली ‘ मानली जाऊ लागली. १९५० सालापासून ही इमारत अगदी निर्मनुष्य झाली. एके काळी बेल्जिअन अरबपती बॅरन एदुआर्द एम्पेन यांच्या मालकीची असलेली ही इमारत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होती. या ठिकाणी आयोजित केल्या गेलेल्या भव्य मेजवान्यांचा थाट आजही लोकांच्या स्मरणात आहे.

१९०७ ते १९०११ या काळाच्या दरम्यान निर्माण करण्यात आलेली महालवजा भासणारी ही इमारत कॉन्क्रीटची बनलेली असून, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना समजली जाते. ही इमारत दोन मजली असून, यामध्ये भव्य दालने आहेत. यातील भिंतींवर कृष्ण, हनुमान, विष्णू आदी देवादिकांची चित्रे कोरलेली दिसून येतात. या महालामध्ये ठिकठीकाणी सोन्याने मढविलेल्या वस्तू देखील होत्या असे म्हटले जाते. ह्या इमारतीचा मुख्य भाग मंदिराप्रमाणे उंच कळस असलेला बनविण्यात आला आहे. अतिशय उत्तम वास्तूकलेचा नमुना असणारी ही इमारत लवकरच अनेक धनाढ्य व्यक्तींच्या, इतकेच नव्हे तर इजिप्तच्या शाही परिवारातील सदस्यांच्या येण्या जाण्याने गजबजून गेली.

बॅरन एम्पेनच्या तीन पिढ्यांनी इथे वास्तव्य केले. इथे बॅरनची बहिण हेलेना हिचा संशयास्पद रित्या मृत्यू झाल्यानंतर त्यापाठोपाठ एम्पेनची मुलगी मिरीयम हिचाही गूढ मृत्यू झाला. बॅरनचा मृत्यू १९२९ साली झाला. त्यानंतरही त्यांची पुढची पिढी इथेच वास्तव्य करीत होती. त्यानंतर एम्पेन परिवाराने फ्रांसमध्ये स्थलांतर केल्यानंतर हा महाल इजिप्तमधील धनाढ्य व्यक्तीला विकण्यात आला. मात्र ह्या नव्या मालकाने किंवा त्याच्या परिवारापैकी कोणीही इथे वास्तव्यास कधीच आले नाही. त्यांनी हा महाल बंद करून ठेवला. कालांतराने भुरट्या चोरांनी या महालामध्ये शिरून तेथील अनेक वस्तू चोरून नेल्या, आणि हळूहळू हा महाल एकदम उजाड होऊन गेला. ११९० यचा दशकामध्ये ह्या महालाचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला यश आले नाही.

Leave a Comment