१५०० वर्षे जुनी चीनमधील हँगिंग मोनॅस्ट्री


चीनमधील शान्झी प्रांतामध्ये असलेल्या हेंग माउंटन नामक डोंगरावर बनलेली मोनॅस्ट्री अतिशय विलक्षण रित्या निर्मित आहे. ही मोनॅस्ट्री, म्हणजेच बौद्ध भिक्षूंचे प्रार्थनास्थळ आणि निवासस्थाने या डोंगरावरून आधांतरी लटकत असल्यासारखी दिसतात. असे म्हटले जाते, की अवचित नदीला पूर आले, किंवा जलप्रलय झाला, तर त्यापासून या प्रार्थनास्थळाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, म्हणून हे प्रार्थनास्थळ इतक्या उंचीवर, सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते.

भयंकर पाउस किंवा वादळी वारे यांच्यापासूनही ह्या प्रार्थनास्थळाचा बचाव व्हावा असा या स्थळाच्या निर्मितीमागे उद्देश होता. हे प्रार्थनास्थळ अधांतरी लटकत असल्याप्रमाणे दिसत असल्यामुळे याला ‘हँगिंग मोनॅस्ट्री’ या नावाने संबोधले जाते. चिनी वास्तुशास्त्राचे अध्ययन करणाऱ्या लोकांसाठी ह्या प्रार्थनास्थळाचे निर्माण हा एक अभ्यासाचा विषय आहे. डोंगराच्या पाय्थापासून सुमारे ७५ फुटांच्या उंचीवर हे प्रार्थनास्थळ बनलेले आहे.

ह्या प्रार्थना स्थळामध्ये चाळीस वेगवेगळे कक्ष असून हे सर्व कक्ष एकमेकांशी जोडलेले आहेत. ह्या मंदिरामध्ये अनके प्पुरातन मूर्ती आहेत. चीनमधील देतोंग क्षेत्रामध्ये असलेले हे मंदिर पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. पण केवळ डोंगरावर निर्मित मंदिर म्हणूनच नाही, तर अनेक धार्मिक कारणांसाठी देखील हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे प्रार्थनास्थळ पाहण्यासाठी केवळ आशियातूनच नाही, तर जगभरातून पर्यटक इथे येत असतात. ह्या प्रार्थनास्थळापर्यंत पोहोचण्याचा रस्ता लाकडी आणि लोखंडाच्या जिन्यांचा बनलेला आहे.

Leave a Comment